Share

Rohit Pawar | महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठी गोविंदा आरक्षणाचा निर्णय; रोहित पवार

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | मुंबई : काल श्रीकृष्णाचा जन्मदिवस होता. त्यामुळे काल देशभरात सगळीकडे श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली गेली. जन्माष्टमीचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याची घोषणा केली. हा निर्णय झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतं आहे. शिंदे घेतलेल्या निर्णयाच्याविरोधात अनेक राजकीय नेत्यांनी वक्तव्य केलं आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर टीका केली आहे.

गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण-

दहीहंडीतील गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंदर्भात ट्विट केलं आहे. तसेच अनेक विद्यार्थी आणि खेळाडूंनी फोन करुन त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली असल्याचंही त्यांनी त्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा-

त्याचबरोबर पुढे त्यांनी लिहिलं आहे की, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध नाही. मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, ही अपेक्षा.

 तृप्ती देसाई यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल-

दरम्यान, रोहित पवार यांच्या व्यतिरीक्त समाजसेविका तृप्ती देसाई यांनीही शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील, असं तृप्ती देसाई यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!