Share

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही मिळाली?, चंद्रकांत पाटील म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळेल अशी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती, परंतु समर्थकांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राजकीय पुनर्वसन न झाल्याने पंकजा मुंडे यांची पक्षावरची नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट दिसून आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत (Chandrakant Patil) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न विचारला असता चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. ‘या वर्षभरात खूप वाव आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळेल. बावनकुळेंना दोन वर्षांनंतर तिकीट मिळाले’, असं म्हणत चंद्रकात पाटलांनी याकडे जास्त लक्ष वेधले आहे.

माझे माता-पिता, माझे सर्वस्व तुम्ही आहात. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होईन, पण पदासाठी कुणासमोर हात पसरणार नाही. आमच्या रक्तातच तशी सवय नाही. ‘राजकारणात संधी मिळाली नाही, पण लोकांच्या सेवेची संधी सोडणार नाही’, अशी शपथ मी गोपीनाथ मुंडे यांना अग्नी देताना घेतली होती असे सांगतानाच पद असो वा नसो, जनतेच्या सेवेला प्राधान्य देईन. कार्यकर्त्यांना आणि जनतेला कधीच अंतर देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!