Share

Rutuja Latke | ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेला  राजीनामा देऊनही अद्याप स्वीकारला नाहीय. परंतू मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे ठाकरे गटाला आनंद झाला आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर ?

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मी सकाळीच सांगितले होते की, मुंबई महानगरपालिका तोंडावर आपटणार आहे. मुंबई पालिकेला स्वायत्तता आहे. त्यामुळे कोणाच्यातरी दबावाला बळी पडून आपले हसे करून घेऊ नये. न्यायालयाने ऋतुजा लटके यांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे.”

उमेदवारी जाहीर झालेल्या ऋतुजा लटके यांच्या मुंबई महानगरपालिकेविरोधातील याचिकेवर गुरुवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठाने पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना उत्तर देण्यासाठी तासाभराचा अवधी दिला होता. त्यानंतर ऋतुजा लटके यांचा जमीन मंजूर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. ऋतुजा लटके ज्या पदावर आहेत, त्यानुसार राजीनामा हा सहआयुक्तांकडून मंजूर होतो. निवडणूक लढवत असल्याने राजकीय दबावामुळे राजीनामा मंजूर केला जात नसल्याचे लटके यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!