🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ‘भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपलब्ध राहण्याचे आवाहन केले आहे. पक्ष पातळीवर अन्न, गरम कपडे, औषधे, सॅनिटरी पॅड्स, ओडोमॉस आदी साहित्य उपलब्ध करावे’ , अशी कळकळीची विनंती सर्व कार्यकत्यांना आणि समाज बांधवांना करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी मिळून ५० लाख रुपयांची मदत पूरग्रस्तांना करणार असल्याची घोषणा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर शासकीय यंत्रणाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अपार कष्ट घेत आहेत.
दरम्यान, या पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पाहणी केली. यावर बोलताना आंबेडकर यांनी, ‘महापूराने बाधित झालेल्या नागरिकांना मदतीची गरज आहे, त्यामुळे केवळ विमानातून घिरट्या घालून काही होणार नाही’, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
राज्यातील पूरपरिस्थितीला मुख्यमंत्रीचं जबाबदार : विजय वडेट्टीवार
भाजप मंत्र्यांनी लाज सोडली ?, महापुराची पाहणी करणाऱ्या महाजनांची हसत सेल्फीसाठी पोझ
कोल्हापूर-सांगलीत महापुर,नांदेड शहरात तीव्र पाणी टंचाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

