🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पश्चिम महाराष्ट्रात सध्या अभूतपूर्व परिस्थिती पहायला मिळत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला नाही, तर कोल्हापूर व सांगली सारख्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये शेती आणि पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक लोक अद्यापही पुरात अडकलेले आहेत.
या पूर परिस्थितीविषयी विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले आहे. ‘कोल्हापूर, सांगलीतील परिस्थीती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. गत चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभीर्याने विचार केला नाही’, अस विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत तसेच मुंबई-बंगळूरू महामार्ग मागील पाच-सहा दिवसांपासून ठप्प आहे. पुरात सापडलेल्या लोकांपर्यंत मदत पोहचत नाही. एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणा अत्यंत तोकडी पडलेली आहे. मुख्यमंत्री आधी प्रचार यात्रेत मश्गूल होते तर संबंधित खात्याच्या मंत्र्यांनीही फारसे गांभीर्याने पाहिले नाही असही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनाला नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शेतीचे नुकसान झाले असेल त्याची नुकसान भरपाई दिली जाईल. त्याची चिंता करू नका. ती आमची जबाबदारी आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.
उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे करणार पूरग्रस्त भागाची पाहणी
जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नव्या युगाला सुरुवात – मोदी
कोल्हापूर-सांगलीत महापुर,नांदेड शहरात तीव्र पाणी टंचाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
