Share

“माझ्या कारकिर्दीत अनेक खलनायक”; धोनीनंतर आता भज्जीचे बीसीसीआयवर गंभीर आरोप

Published On: 

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर असलेल्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. निवृत्तीनंतर हरभजन आता अनेक गोष्टींचा खुलासा करत आहे. यापुर्वी त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरही काही मोठे आरोप केले होते. दरम्यान त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) ताशेरे ओढले आहेत. 

हरभजनने बीसीसीआय अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. तो म्हणाला, “बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना माझी संघात वापसी व्हावी असे वाटत नव्हते. तेव्हा धोनी कर्णधार होता आणि त्यानेही अधिकाऱ्यांना साथ दिली. माझा बायोपिक चित्रपट किंवा वेब सिरीज बनवली तर त्यात एक नाही तर अनेक खलनायक असतील.”
 
भज्जी म्हणाला, “तेव्हा महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) संघाचा कर्णधार होता, पण माझा विश्वास आहे की या सर्व गोष्टी धोनीच्या डोक्यावरून जात असाव्यात. यात बीसीसीआयचे काही अधिकारी सामील होते, ज्यांना माझे खेळने नको होते. त्यांना कर्णधारानेही (महेंद्रसिंह धोनी) त्यांना साथ दिली. मात्र, बीसीसीआयपेक्षा कर्णधार, प्रशिक्षक किंवा संघ कधीच मोठा नसतो.”

धोनीला बाकीच्या खेळाडूंपेक्षा चांगला पाठिंबा मिळाला

“धोनीला बाकीच्या खेळाडूंपेक्षा जास्त आणि चांगला पाठिंबा मिळाला. इतर कोणत्याही खेळाडूला अशी साथ मिळाली असती तर तोही आणखी चांगला खेळू शकला असता. बाकीचे खेळाडू चेंडू स्विंग करायला विसरले किंवा बॅट चालवायला विसरले असे नाही. प्रत्येक खेळाडूला टीम इंडियाची जर्सी घालून निवृत्ती घेण्याची इच्छा असते, परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असे घडत नाही. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग यासारखे अनेक खेळाडू तुम्ही उदाहरण म्हणून पाहू शकता,” असे देखील भज्जी म्हणाला. 

माझ्या करिअरवर बायोपिक किंवा वेब सिरीज बनावी

हरभजन म्हणाला की, “माझ्या करिअरवर बायोपिक किंवा वेब सिरीज बनावी, अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून लोकांना माझी बाजूही पाहायला मिळेल. मी माझ्या कारकिर्दीत काय केले आणि इतर लोकांनी माझ्यासोबत काय केले हे देखील तुम्ही पाहू शकाल. माझ्या बायोपिकमध्ये खलनायक कोण असेल हे मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या बायोपिकमध्ये एक नाही तर अनेक खलनायक दिसणार आहेत.”
महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!