Share

शिखर धवनच्या भारतीय संघात पुनरागमनाबद्दल माजी क्रिकेटरचे मोठे वक्तव्य

Published On: 

शिखर धवनचे (Shikhar Dhawan) वनडे संघात पुनरागमन झाल्याबद्दल माजी सलामीवीर आकाश चोप्राने (Aakash Chopra) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धवनचा वनडे संघात समावेश झाल्यामुळे खूप आनंद होत असल्याचे आकाश चोप्राने म्हटले आहे. याआधी शिखर धवनचा वनडे संघात समावेश होणार नसल्याचा अंदाज लावला जात होता. 
 
विजय हजारे ट्रॉफीमध्ये  शिखर धवनची कामगिरी चांगली नव्हती आणि त्यामुळे त्याची संघात निवड होण्याची आशा फार कमी होती. मात्र रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. 
 
आकाश चोप्रा म्हणाला, “शिखर धवन संघात असावा असे मी वारंवार सांगत होतो. तो संघात आहे याचा मला खूप आनंद आहे. रोहित शर्मा, केएल राहुल आणि शिखर धवन एकत्र संघात असतील तर कोण खेळणार यावर निश्चितच लढत आहे. धवन संघात आहे आणि त्यामुळे त्याला सलामीची संधी मिळावी असे मला वाटते.” 
 
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ –
 
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युझवेंद्र चहल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
हेही वाचा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!