Share

भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करून पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद

Published On: 

नवी दिल्ली : अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार निर्धारित लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. प्रथम खेळताना श्रीलंकेने 38 षटकांत 9 बाद 106 धावा केल्या. भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळाले, ते पूर्ण करताना त्यांनी 1 गडी बाद 104 धावा केल्या.

श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र तो योग्य ठरला नाही. त्यांची पहिली विकेट चामिंदु विक्रमसिंघेच्या रूपाने पडली. तो 2 धावा करून बाद झाला. यानंतर श्रीलंकेच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या. सेवोन डेनियल आणि अंजेला बंडारा अनुक्रमे 6 आणि 9 धावांवर बाद झाले. यानंतर आणखी काही विकेटही पडल्या. खालच्या फळीकडून यासिरु रोड्रिगोने सर्वाधिक १९ धावा केल्या. इतर सर्व प्रमुख खेळाडू फ्लॉप ठरले.

श्रीलंकेच्या संघाने 38 षटकांत 9 बाद 106 धावा केल्या आणि यावेळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवावा लागला. यानंतर सामना 38 षटकांचा असल्याने भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार 99 धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताच्या डावाच्या 15 षटकांनंतर पुन्हा एकदा 102 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने प्रथम फॉर्मात असलेला फलंदाज हरनूर सिंगची विकेट गमावली. तो अवघ्या 5 धावा करून बाद झाला. यानंतर अंगक्रिश रघुवंशी आणि शेख रशीद यांनी दुसऱ्या विकेटसाठी भक्कम भागीदारी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले. 99 धावांचे लक्ष्य असताना ते पुन्हा 102 पर्यंत सुधारले. भारताने 22 व्या षटकात 1 गडी बाद 104 धावा करून सामना जिंकला आणि आशिया चषकाचे विजेतेपदही पटकावले. अंगक्रिशने नाबाद ५६ धावा केल्या. त्याच्याशिवाय शेख रशीदने नाबाद 31 धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!