Share

क्विंटन डी कॉकची अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर काही तासांनी दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकने कसोटी क्रिकेटमधून सन्यास घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. माजी कसोटी कर्णधार, डी कॉक केवळ 29 वर्षांचा आहे आणि आता तो फक्त T20 लीगवर अधिक लक्ष केंद्रित करून, प्रोटीजसाठी टी२० आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळत राहील.

डी कॉकने आपल्या निवृत्तीमागे वाढत्या कौटुंबिक जबाबदाऱ्या हे कारण सांगितले आहे. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याच्या उद्देशाने त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डी कॉकने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एकूण 34-21 धावा केल्या आहेत.

ट्विट करून डी कॉक म्हणाला, “हा निर्णय घेणे काही सोपे नव्हते. पण मी यावर विचार करायला बराच वेळ घेतला आहे. भविष्य आणि आयुष्याचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. साशा आणि मी आमच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची वाट पाहत आहोत. डी कॉक पुढे म्हणाला की, “माझे कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि मी माझ्या आयुष्यातील या नवीन आणि रोमांचक अध्यायात त्यांच्यासोबत वेळ काढण्यास उत्सुक आहे.”

डी कॉकने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रोटीज कसोटी पदार्पण केले. 54 सामन्यांमध्ये त्याने 38.82 च्या सरासरीने आणि 70.93 च्या स्ट्राइक रेटने 3300 धावा केल्या आहेत ज्यात त्याने नाबाद 141 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी सामन्यांमध्ये एकूण 6 शतके आणि 22 अर्धशतके आहेत, ज्यात 221 झेल आणि 11 स्टंपिंगचा समावेश आहे. डी कॉकने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तिसरे सर्वाधिक झेल घेतले आहेत – 11 सामन्यांमध्ये 48 (47 झेल आणि 1 स्टंपिंग) आणि 2019 मध्ये सेंच्युरियन येथे इंग्लंडविरुद्ध एका डावात वैयक्तिक सर्वोत्तम सहा विकेट्स.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!