Share

IPL 2022 : CSKचे कर्णधारपद जडेजाकडे गेल्यानंतर रैनाने केली पोस्ट; लिहले “त्याच्यापेक्षा योग्य…”

Published On: 

मुंबई : माजी भारतीय खेळाडू सुरेश रैनाला अनुभवी खेळाडू एमएस धोनीकडून आयपीएल २०२२ मध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद स्वीकारताना पाहून खूप आनंद झाला आहे. धोनीने १३ आयपीएल आवृत्त्यांमध्ये नेतृत्व केल्यानंतर CSK च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. ज्यात त्याने रवींद्र जडेजाकडे संघाची सूत्रे सोपवली.

सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या रैनाने(suresh raina) धोनीच्या (ms dhoni) निर्णयाचे स्वागत केले आणि त्याला असे वाटते की जडेजापेक्षा चांगले कोणीही फ्रेंचायझीचे नेतृत्व करू शकत नाही. “माझ्या भावासाठी पूर्णपणे रोमांचित. आम्‍ही दोघे जिथे मोठे झालो त्या फ्रँचाइजीचा ताबा घेण्‍यासाठी मी तुझ्याशिवाय कोणाचाही चांगला विचार करू शकत नाही. ऑल द बेस्ट जडेजा. हा एक रोमांचक टप्पा आहे आणि मला खात्री आहे की तु सर्व अपेक्षा पूर्ण करशील. ” रैनाने जडेजाला CSK चा नवा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर काही तासांनी ट्विट केले.

IPL 2022 च्या खेळाडूंच्या रिटेन यादीमध्ये, जडेजाला १६ कोटींमध्ये CSK चा पहिला पसंतीचा खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले होते. तर धोनीने १२ कोटींच्या रकमेसह स्वतःला दुसऱ्या स्थानावर ढकलले होते. सीएसकेचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध २६ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यात जडेजा पहिल्यांदा कर्णधार म्हणून मैदानावर उतरेल.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!