मुंबई : आयपीएल २०२२ सुरू होणार आहे आणि त्याआधीच एमएस धोनीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. होय, पहिला सामना CSK आणि KKR यांच्यात होणार आहे. या सीझनबद्दल चाहते खूप उत्सुक होते. पण, आता चेन्नई सुपर किंग्जने अधिकृतपणे एमएस धोनीने कर्णधारपद सोडल्याची घोषणा केली असून त्याच्या जागी संघाची कमान सर रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली आहे.
या हंगामातील पहिला सामना २६ मार्चपासून खेळवला जाणार आहे आणि महेंद्रसिंग धोनीने (MS dhoni) अगदी दोन दिवसांआधी CSK चे कर्णधारपद सोडून सर्वांनाच धक्का दिला आहे. मात्र, मेगा ऑक्शनपूर्वीच तो कर्णधारपद सोडणार असल्याची अटकळ बांधली जात होती. पण, १५ वा सीझन सुरू होण्यापूर्वी हा निर्णय येईल याची कुणालाही कल्पना नव्हती. काही महिन्यांपूर्वीच जडेजाने (Ravindra jadeja) गंमतीत मला कर्णधार बनायचे आहे असे सांगितले होते.
???? Official Statement ????#WhistlePodu #Yellove ???????? @msdhoni @imjadeja
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
एमएस धोनी हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला ४ वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. त्याचबरोबर संघाने ९ वेळा अंतिम फेरी देखील गाठली आहे. जी कोणत्याही कर्णधारासाठी सर्वात मोठी उपलब्धी असते. याशिवाय या स्पर्धेत कर्णधार म्हणून तो .२०४ सामने खेळला आहे, त्यापैकी १२१ जिंकले आहेत आणि ८२ गमावले आहेत. धोनीचा कर्णधारपदाचा विक्रम उत्कृष्ट राहिला आहे. आता त्यानंतर चेन्नईची सूत्रे सर जडेजा सांभाळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- लग्न कायदेशीर नव्हतचं! तीन महिन्यानंतर समोर आले विकी-कतरिनाच्या लग्नाचे सत्य
- राज्य सरकारकडून मराठा समाजाने अपेक्षा ठेवू नये- निलेश राणे
- IPL 2022: आयपीएलवर आतंकवाद्यांचे सावट; वानखेडे स्टेडियमची रेकी केल्याची दिली कबुली
- कृष्णा-मराठवाडा प्रकल्पातील उर्वरित 16.66 टिएमसी पाणी कसे उपलब्ध होईल? जयंत पाटलांनी दिले उत्तर
- महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध नितीन राऊतांनी उगारला कारवाईचा बडगा


