🕒 1 min read
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आज आपला ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. २४ एप्रिल १८७३ रोजी मुंबईत जन्मलेल्या सचिन तेंडुलकरने वयाच्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी त्याने पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळला होता, पण तुम्हाला हे माहीत आहे का, की त्याआधी सचिन पाकिस्तान (Pakistan) संघाकडून खेळला होता!
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला होता. २० जानेवारी १९८७ रोजी तो इम्रान खानच्या संघाकडून मैदानात उतरला. सचिन तेंडुलकरने त्याच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात, याबाबत खुलासा केला आहे. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारताच्या दौऱ्यावर होता, जिथे दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि कसोटी मालिका होणार होती. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सराव सामना खेळला.
You could spend Sachin Tendulkar's birthday recollecting his ???? hundreds ???? pic.twitter.com/8N9xLJicYV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 24, 2022
हा सामना प्रत्येकी ४० षटकांचा होता. भारताचा संघ फलंदाजी करत असताना जावेद मियांदाद आणि अब्दुल कादिर यांनी जेवणाच्या वेळी मैदान सोडले. पाकिस्तानकडे पर्यायी खेळाडू नव्हते. अशा परिस्थितीत १४ वर्षीय सचिनला पाकिस्तानसाठी क्षेत्ररक्षण करावे लागले. खुद्द सचिनने पाकिस्तानी संघाला क्षेत्ररक्षणासाठी विचारणा केली होती. सचिन तेंडुलकरने पाकिस्तान संघासाठी सुमारे अर्धा तास क्षेत्ररक्षण केले. तो सीमारेषेवर लाँग ऑनवर तैनात होता.
6⃣6⃣4⃣ international matches
3⃣4⃣,3⃣5⃣7⃣ international runs
1⃣0⃣0⃣ international tons
2⃣0⃣1⃣ international wicketsHere's wishing the ever-so-inspirational & legendary @sachin_rt a very happy birthday. ???? ???? ???? #TeamIndia pic.twitter.com/d70JoSnJd8
— BCCI (@BCCI) April 24, 2022
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता १०० शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने २०० कसोटी सामन्यांच्या ३२९ डावांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ६ द्विशतके, ५१ शतके आणि ६८ अर्धशतके केली आहेत. ४६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ शतके आणि एक द्विशतकाच्या मदतीने त्याने १८,४२६ धावा केल्या. सचिनने २००६ साली भारतासाठी एकमेव टी-२० सामना खेळला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
