मुंबई : क्रिकेटचा देव म्हटला जाणारा भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस (Happy birthday Sachin Tendulkar) आहे. सचिन आज २४ एप्रिल २०२२ रोजी त्याचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. मुंबईकर आणि मास्टर ब्लास्टर सचिनने आपल्या कारकिर्दीत इतके मोठे विक्रम केले आहेत की त्याच्याशी बरोबरी करणे अनेक खेळाडूंसाठी स्वप्नासारखे आहे. वयाच्या १६व्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या सचिनने २४ वर्षे राज्य केले. केली. सचिन सध्या आयपीएल २०२२मध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) मेंटॉर असून बायो-बबलमध्येच त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
मुंबई इंडियन्स संघाने सचिनच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये मुंबईच्या संघातील तरूण खेळाडूंनी सचिनला शुभेच्छा दिल्या. यात सचिनचा मुलगा अर्जुनचाही समावेश आहे. ”मला तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजचा दिवस आनंदात साजरा करा. तुम्ही आजवर माझ्यासाठी जे काही केलंय त्यासाठी आभार”, अशा शब्दात अर्जुनने आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या.
"He inspired all of ???????? to watch cricket." ????
The boys wish & share their experience of meeting ???????????????????????? for the first time on his special day ???? pic.twitter.com/JQ9wquIPZW
— Mumbai Indians (@mipaltan) April 24, 2022
अर्जुनव्यतिरिक्त तिलक वर्मा, डेवाल्ड ब्रेविस, ऋतिक शोकीन, राहुल बुद्धी, आर्यन जुयाल या मुंबई इंडिन्समधील युवा खेळाडूंनी सचिनला पहिल्यांदा भेटल्याच्या आठवणी सांगितल्या. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा आणि शतके करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके करणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. २०१२मध्ये, त्याने एकदिवसीय आणि २०१३मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

