🕒 1 min read
मुंबई : हिवाळा असो की पावसाळा, केसांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. केसांचा कोरडेपणा वाढणं आणि ते पातळ होऊन त्यांच तुटणं यासारख्या समस्या ऋतूच्या बदलाबरोबर वाढू शकतात. अशा स्थितीत अनेक औषधी वनस्पती घरगुती उपचार आणि आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरल्या जातात, ज्यामुळे केसांच्या या समस्यांपासून मुक्ती मिळते. शिवाय केसांचे आरोग्यही सुधारतं.
आहारतज्ञ रुजुता दिवेकर यांनी अलीकडेच केसांसाठी फायदेशीर अशा काही नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून घरगुती केसांचं तेल कसं बनवायचं हे शेअर केलं आहे. सोशल मीडिया पेजवर त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, त्यांच्या आईकडून त्यांनी ही रेसेपी शिकल्याचं सांगितलं आहे. यामध्ये त्यांनी आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं हे शेअर केलं आहे.
केसांसाठी आयुर्वेदिक तेल कसं बनवायचं
साहित्य
जास्वंदाची फुले
कडुलिंबाच्या झाडाची पाने
कढीपत्ता किंवा गोड कडुलिंबाची पाने
कांदा
मेथीचे दाणे
कोरफड जेल
मोगरे, गुलाब किंवा बकुळ फुले
खोबरेल तेल
पद्धत
एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून सुमारे एक तास ठेवा. कोरफडीच्या पानाच्या मध्यभागी चीर करुन त्याचे जेल काढा. नंतर, एका मोठ्या भांड्यात, खोबरेल तेल वगळता सर्वकाही मिक्स करुन द्या. आता या सर्व गोष्टी बारीक करुन घ्या. तुम्ही ब्लेंडर किंवा मिक्सर ग्राइंडरनेही बारीक करू शकता. औषधी वनस्पती बारीक केल्यानंतर, ही पेस्ट एक लिटर खोबरेल तेलात मिसळा आणि गरम करा.
लक्षात ठेवा हे मिश्रण गरम करत असताना मंद आचेवर गरम करा. सुमारे 40 मिनिटे शिजवून मिश्रणाचा रंग घट्ट झाल्यावर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. नंतर, गाळून घ्या आणि काचेच्या बरणीत किंवा बाटलीत भरा.
अशा प्रकारे वापरा
तुमचे केस 2-3 भागांमध्ये विभाजित करा आणि हे तेल टाळू आणि केसांना चांगले मालिश करा.
ज्या लोकांना केस कोरडे पडण्याची तक्रार आहे त्यांनी केसांच्या बाजूने तेलाने चांगले मसाज करा.
जे खोबरेल तेल वापरत नाहीत ते तिळाचे तेल वापरू शकतात.
महत्वाच्या बातम्या :
- Solapur | कौतुकास्पद! राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत सोलापूरचे वर्चस्व
- Heart Tips | हृदय निरोगी ठेवण्यासाठी आजपासून ‘या’ 3 गोष्टी लक्षात ठेवा
- New Car Launch | टाटा मोटर्स चे Tata Nexon XZ + (L) व्हेरियंट लाँच,जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
- Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचे राज्य सरकारवर धक्कादाक आरोप, म्हणाले…
- Raju Srivastav Death | “हरहुन्नरी कलावंत गमावला” ; एकनाथ शिंदे यांची राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
