Share

Hair Care Tips | हिवाळ्यामध्ये केसांना कोमट तेल लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Published On: 

🕒 1 min read

Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा सुरू होताच केसांच्या (Hair) अनेक समस्या सुरू व्हायला लागतात. थंड वातावरणामुळे केस कोरडे (Dry) होण्याची समस्या वाढत जाते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक पर्याय अवलंबवतात. त्याचबरोबर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने वापरायला सुरुवात करतात. पण ही उत्पादने केसांना आणि त्वचेला हानी पोहोचू शकतात. कारण यामध्ये विविध प्रकारच्या रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे हिवाळ्यात केसांच्या समस्या टाळायच्या असेल, तर तुम्ही केसांना कोमट तेल लावू शकतात. कोमट तेल लावल्याने केसांना पोषण मिळते. त्याचबरोबर कोमट तेलाच्या वापराने केस निरोगी राहू शकतात. हिवाळ्यामध्ये नियमित केसांना कोमट तेल लावल्याने पुढील फायदे मिळू शकतात.

केसांमधील कोरडेपणाची समस्या दूर होते

हिवाळ्यामध्ये नियमित केसांना कोमट तेल लावल्याने केसांचा कोरडेपणा दूर होऊ शकतो. कारण कोमट तेल केसांना आणि टाळूला पोषण प्रदान करते. त्यामुळे नियमित तेल लावल्याने केसांची मसाज होऊन केस निरोगी राहू शकतात. कोमट तेल लावल्याने टाळूला आतून पोषण मिळण्यास मदत होते.

केस गळतीची समस्या दूर होते

या ऋतूमध्ये केसांना कोमट तेल लावल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. हिवाळ्यामध्ये केस गळतीची समस्या थांबवण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा कोमट तेलाने केसांना मसाज केली पाहिजे. नियमित असे केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

केसांची वाढ वेगाने होते

केसांची कोमट तेलाने मसाज केल्याने केस लवकर वाढतात. आठवड्यातून किमान दोनदा कोमट तेलाने डोक्याला मसाज केल्याने केसांची वाढ लवकर होते. त्याचबरोबर केस गळती थांबते. नियमित कोमट तेल लावल्याने केसांमधील कोंड्याची समस्या देखील दूर होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!