Share

Hair Care | स्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टी वापरून केस राहू शकतात निरोगी

Published On: 

🕒 1 min read

Hair Care | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल केस गळणे (Hair Fall), केस खराब होणे (Hair Damage) या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहे. कारण आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रदूषणामुळे केसांच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. केस वाढीसाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा अवलंब करत असतो. कारण चमकदार आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी अनेकजण महागडे उत्पादनं वापरतात. पण या उत्पादनाच्या वापराने केस दीर्घकाळ निरोगी राहू शकत नाही. केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करू शकतात. तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या काही गोष्टींच्या मदतीने केसांची काळजी घेऊ शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करू शकतात.

कांदा

केसावरील समस्यांवर मात करण्यासाठी कांदा एक रामबाण इलाज ठरू शकतो. कांद्याच्या मदतीने केस वाढण्यास मदत होते. यासाठी तुम्ही कांदा किसून त्याचा रस काढून तो केसांना लावू शकतात. तुम्हाला साधारण अर्धा तास केसांना कांद्याचा रस लावून ठेवावा लागेल. त्यानंतर तुम्ही तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागेल.

दही

भारतीय स्वयंपाक घरामध्ये दही सहज उपलब्ध होते. दही आरोग्यासोबत केसांसाठी ही खूप उपयुक्त असते. केसांची वाढ वाढवण्यासाठी दही फायदेशीर आहे. कारण दह्यामध्ये प्रोटीन आणि विटामिन बी 5 मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. हे गुणधर्म केसांना पोषण प्रदान करतात. त्यामुळे केसांना दही लावल्याने केसांचे वाढ वाढते. तुम्हाला साधारण केसांना अर्धा तास दही लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या नियमित शाम्पूने केस धुवावे लागेल.

लिंबू

केसांची थांबलेली वाढ पुन्हा सुरू करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. तुम्ही केसांची निगा राखण्यासाठी केसांना लिंबाचा रस लावू शकतात. लिंबाचा रस लावल्यानंतर अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागते. याचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!