🕒 1 min read
जळगाव : शिवसेनेतून बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं. या सगळ्या घडामोडींवर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जळगावात काल रात्री उशिरा गुलाबराव पाटील पोहोचले. त्यानंतर त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले.
तसेच आम्ही उद्धव ठाकरेंना सोडलं नाही, तर त्यांनी आम्हाला सोडलं असल्याचं देखील त्यांनी त्यांच्या समर्थकांना बोलून दाखवलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी अजूनही सावध रहावं, असा सल्ला देखील त्यांनी ठाकरेंना दिला. वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकून न घेतल्याने शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही बंडखोरी नव्हे तर उठाव केला. आम्ही बंडखोर नसून आमच्या बाळासाहेबांचे घर जे चौफेर जळत आहे. ते आग विझवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहे. उद्धव ठाकरे यांना फसवले. त्यांनी सावध राहून फसवणाऱ्या लोकांना दूर करा, असा सल्लाही यावेळी गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना दिला.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
