🕒 1 min read
जळगाव : महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. दररोज काहीतरी नवीन गोष्टी घडत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे गट व भाजपने सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र यावेळी शिवसेनेतून बंद करत एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर आता या सगळ्या घडामोडींवर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
जळगावात काल रात्री उशिरा गुलाबराव पाटील पोहोचले. त्यानंतर त्यांचं तिथं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आणखी काही खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर 18 पैकी 12 खासदार, 20 माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच काही खासदारांना आपण भेटलो असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही उभी करणार असल्याचा निर्धार केल्याचे गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित समर्थकांना सांगितले.
दरम्यान, सोमवारी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील राज्यात विधानसभेसाठी मध्यवधी निवडणुका लागतील असं म्हटलंय. तर यानंतर पुढे सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती पाहता मध्यावधी निवडणुका लागणार आहेत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
