मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर खोटक टीका करत एक कविता ट्विट केली आहे. सध्या राज्यभरात अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. त्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, म्हाडा, आरोग्य विभागाच्या परीक्षांची पेपर फूटी, शाळा सुरु करण्याबाबत संभ्रम, एमपीएससीच्या परीक्षाबाबत घोळ, ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न, मराठा आरक्षण आदी प्रश्नांवर सरकार उत्तर देत नसल्याने ‘सरकार हरवले आहे’, अशी कविता चित्रा वाघ यांनी केली आहे.
चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची कविता ….
देशमुख, परब, मुश्रीफ
वसूलीचं व्यसन जडले आहे
सरकार हरवले आहे
राऊत, राठोड, लंके,
रोड रोमियो भरले आहे
सरकार हरवले आहे
#ST मागण्या
#MPSC भरती
मराठा #OBC आरक्षण
कित्येकदा
थोबाडावर पडले आहे
सरकार हरवले आहे
मंत्री, मुख्यमंत्री
आता
कणाहीन नेतृत्व उरले आहे
#MVA सरकार हरले आहे
हरवले आहे..!!
अशी कविता भाजपा नेते चित्रा वाघ यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक
- ‘हे पाहून इतिहासात केवळ मोदींनीच गंगेत स्नान केलंय असं वाटतंय’
- कोहलीला डच्चू देत आकाश चोप्राने 2021 च्या टॉप पाच कसोटी फलंदाजांची केली निवड
- ‘बेताल, बेजबाबदार, असंवेदनशील पुरूषीवृत्ती कडूनच महिलांचे रक्षण करण्याची गरज’
- ‘अनिल परबांनी अनेकदा मूभा दिली पण आता सहनशीलता संपली आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

