Share

‘बेताल, बेजबाबदार, असंवेदनशील पुरूषीवृत्ती कडूनच महिलांचे रक्षण करण्याची गरज’

Published On: 

मुंबई: कर्नाटक विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार केआर रमेश कुमार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केले आहे. त्यांनी कर्नाटक विधानसभेत म्हटले आहे की, बलात्कार थांबवता येत नसेल तर झोपा आणि आनंद घ्या. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर मात्र त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यावरच आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सडकून टीका केली आहे.

लोकशाहीचे पवित्र मंदिर विधानभवनाचा आब घालवणारी घटना कर्नाटक विधानसभेत घडली आहे.महिलांप्रती पुरूष लोकप्रतिनिधींच्या भावना काय आहेत हे दिसून आलं. बोलणा-यासोबतच अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसून हसणारे पण दोषी. बेताल…बेजबाबदार..असंवेदनशील पुरूषीवृत्ती कडूनच महिलांचे रक्षण करण्याची गरज आहे. असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान कर्नाटकातील पूर आणि पिकांचे झालेले नुकसान यावर विधानसभेत चर्चेची मागणी आमदार करत होते. यावरूनही कर्नाटक विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. दरम्यान, सभापतींनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळ कमी झाला नाही. सर्वांनाच वेळ दिला तर हे अधिवेशन कसे जाणार, असे सभापती म्हणाले.यानंतर सभापती हसले आणि त्यांनी ‘मी अशा स्थितीत आहे की मला मजा करायची आहे. ठीक आहे, मला तेच वाटते. मी परिस्थिती नियंत्रित करणे थांबवले पाहिजे. तुम्ही चर्चा चालू ठेवा. अशा शब्दांत सभापती यांनी संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!