Share

कोहलीला डच्चू देत आकाश चोप्राने 2021 च्या टॉप पाच कसोटी फलंदाजांची केली निवड

Published On: 

नवी दिल्ली : आकाश चोप्राने (Aakash Chopra) 2021 सालातील टॉप पाच कसोटी फलंदाजांची निवड केली आहे. या यादीत दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक फलंदाजांनी खूप धावा केल्या आहेत. यावर्षी किमान 500 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिमुथ करुणारत्नेची (Dimuth Karunaratne )सरासरी सर्वाधिक आहे.

आकाश चोप्राने आपल्या संघात प्रथम पाकिस्तानचा फलंदाज फवाद आलमची निवड केली आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान तो म्हणाला, फवाद आलमचेही नाव या यादीत आहे, ज्याची मी निवड केली आहे. त्याने सात सामन्यांमध्ये 57.1 च्या सरासरीने तीन शतकांसह 513 धावा केल्या आहेत. जेव्हापासून त्याने पुनरागमन केले तेव्हापासून तो पुढे जात आहे. प्रत्येक संधीचा तो पुरेपूर फायदा घेत आहे.

आकाश चोप्राने ऋषभ पंतचाही आपल्या संघात समावेश केला आहे. या शिवाय आकाश चोप्राने लाहिरू थिरिमाने याचीही निवड केली आहे. लाहिरूने सात सामन्यांमध्ये 50.6 च्या सरासरीने 659 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या १४० धावा आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेत खेळला आहे. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध, वेस्ट इंडिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि बांगलादेशमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळले. या यादीत तिसरे नाव ऋषभ पंतचे आहे. त्याने यावर्षी 11 सामन्यात 41.5 च्या सरासरीने 706 धावा केल्या आहेत. त्याने फक्त एकच शतक झळकावले आहे आणि यादरम्यान किपिंग देखील उत्कृष्ट आहे.

रोहित शर्मानेही या वर्षी जबरदस्त कामगिरी केली असून आकाश चोप्रानेही त्याचा या यादीत समावेश केला आहे. रोहित शर्माने यावर्षी 11 सामन्यात दोन शतके झळकावत 906 धावा केल्या आहेत. याशिवाय आकाश चोप्राने जो रूटचे वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून वर्णन केले आहे. रुटने यावर्षी 12 सामन्यात 6 शतके झळकावत 1455 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!