मुंबई : आजवर अनेक लोकांनी गंगेत स्नान केले. मात्र सध्या जे सुरु आहे ते पाहून असं वाटतं आहे की इतिहासात फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिने गंगेत स्नान केले, ती म्हणजे नरेंद्र मोदी, असे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले आहेत. यावरुन महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत मोदींवर निशाना साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) काशी यात्रेला गेले होते. तीथे त्यांनी गंगा नदीचे जलपूजन करत गंगेत स्नान केले. त्यांची ही काशी यात्रा चांगलीच गाजली आहे. काशी यात्रेदरम्यान गंगेत डुबकी मारल्याचे छायाचित्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. वाराणसीच्या घाटात डुबकी घेत त्यांनी जलपूजन केले होते. यावर विरोधी पक्ष नेत्यांनी मोदींवर प्रचंड टीका केली आहे.
आजवर अनेक लोकांनी गंगेत स्नान केले. मात्र सध्या जे सुरु आहे ते पाहून असं वाटतं आहे की इतिहासात फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिने गंगेत स्नान केले, ती म्हणजे नरेंद्र मोदी: खा. राहुल गांधी pic.twitter.com/WHuV6NdIL0
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 17, 2021
काशी विश्वनाथ कॉरीडॉरचे उद्घाटन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात पूजा केली. गंगास्थान केले तसेच मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील केले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचारी आणि कामगारांवर पुष्प वर्षाव करून त्यांचा सन्मान केला व त्यांच्यासोबत जेवणही केले. दरम्यान काशी विश्वनाथ कॉरीडॉर या प्रकल्पाच्या फेज १ या प्रकल्पाची किंमत साधारण ३३९ कोटी इतकी आहे. हा प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगेचा वाराणसीमधला किनारी प्रदेश यांना जोडणारा आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?
- महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी
- केंद्रातील भाजपा व संघांचा आरक्षण संपवण्याचा डाव-नवाब मलिक


