पुणे : शिक्षक पात्रा परीक्षेचे पेपर फोडल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. सुपे यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते, चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन अनेकांना पास केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) जागांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचे उघड झाल्याने या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. याप्रकरणी परीक्षेचा कंत्राट दिलेल्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या कंपनीनेच पेपरफुटीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी प्रीतिश देशमुखच्या घराची तपासणी केली असता टीईटीची ओळखपत्र मिळून आली. यावरुन टीईटी परीक्षेतही घोटाळा झाल्याचा संशय पोलिसांना आला आणि तपास केला असता हा घोटाळाही उघड झाला आहे. यानंतर पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली असून या गुन्ह्यात आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी युपीत एकही मृत्यू नाही; योगी सरकारचा दावा
- ‘थकबाकीचा डोंगर वाढतोय, राज्याच्या हक्काचे पैसे मिळायलाच पाहिजे’, शिवसेनेचा केंद्राला इशारा
- बाहेरच्या बाहेर खंडणीचा निधी मिळत असेल तर सरकारी निधीची गरज काय?
- महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या खात्यांना सर्वाधिक निधी
- केंद्रातील भाजपा व संघांचा आरक्षण संपवण्याचा डाव-नवाब मलिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

