Share

IND vs ZIM : विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी बीसीसीआय घेऊ शकते ‘हा’ मोठा निर्णय; वाचा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विराट कोहली आपला गमावलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करायचा आहे. भारतीय संघ सहा वर्षांनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. झिम्बाब्वे दौरा हा विराटला पुन्हा फॉर्म मिळवून देण्यासाठी मोठी संधी ठरू शकतो, असे भारतीय निवड समितीला वाटतं आहे. विराट सध्या विश्रांतीच्या काळात भारतीय संघातून बाहेर आहे.

आशिया चषक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. अशा परिस्थितीत विराटने झिम्बाब्वेविरुद्ध ३ एकदिवसीय सामने खेळून आशिया चषक स्पर्धेत भाग घ्यावा, अशी भारतीय निवड समितीची इच्छा आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला वनडे १८ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे. या दौऱ्यावर केएल राहुल भारतीय संघाची कमान सांभाळू शकतो. राहुल सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. त्याच्यावर नुकतीच जर्मनीत स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.

विराटने लय मिळवण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा करावा

बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, ‘झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ निवडीच्या बैठकीत अजून काही वेळ आहे. लय मिळवण्यासाठी विराटने झिम्बाब्वेचा दौरा करावा अशी आमची इच्छा आहे. विराटचा हा आवडता फॉरमॅट आहे. झिम्बाब्वेविरुद्धची मालिका खेळल्याने त्याला आशिया चषकापूर्वी फॉर्ममध्ये येण्यास मदत होईल. भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर आपला द्वितीय श्रेणी संघ पाठवण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीला वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती

विराट कोहलीला यावेळी वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. विंडीज दौऱ्यावर भारतीय संघ शिखर धवनच्या नेतृत्वाखाली ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना २२ जुलै रोजी होणार आहे. यानंतर भारत यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माचे संघात पुनरागमन होणार आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात त्याला कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत धावा करता आलेल्या नाहीत. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात विराटला केवळ ३१ धावाच करता आल्या. याशिवाय दोन टी-२० सामान्यांमध्ये त्याच्या बॅटमधून १२ धावा आणि दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ३३ धावा झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!