सोलापूर : मराठी माणसाचा सर्वांगीण विकास अन प्रखर हिंदुत्व हे ब्रीद घेऊन हिंदुहृदयसम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना अखंड राहिली पाहिजे. याच एका ध्येयाने सोलापूर ते मुंबई पायी वारी करण्याचा संकल्प दक्षिण सोलापुरातील उळे येथील प्रती दादा कोंडके उत्तम शिंदे यांनी केला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून उत्तम शिंदे मुंबईच्या दिशेने पायी रवाना झाले आहेत. 15 ते 20 दिवसांनी ते मुंबईतील दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाजवळ पोहचतील.
राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना दुभंगते की काय अशी एक भावना सर्वसामान्य शिवसैनिकाची झाली आहे. परंतू स्वर्गिय बाळासाहेबांनी तकष्टाने उभारलेली ही शिवसेना अखंडच राहिली पाहिजे ही राज्यातील शिवसैनिक नाही तर प्रत्येक सामान्यांचीसुध्दा लोकभावना आहे. या भावनेपोटी बाळासाहेबांनी प्रति दादा कोंडके संबोधत ज्याला आशिर्वाद देत छातीला लावून घेतले त्या उळे येथील उत्तम शिंदे यांनी पायी वारीचे पाऊल उचलल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वारकरी जसे आपल्या मनातील भाव पंढरीनाथाच्या पायावर व्यक्त करण्यासाठी भगवी पताका खांद्यावर घेऊन विठूचा अन ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत पायी वारी करतो. तशीच ही सोलापूर ते मुंबईतील स्वर्गिय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळापर्यंत पायी वारी असल्याचे उत्तम शिंदे यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ तमाम शिवसैनिकांसाठी प्रती पंढरपूरच आहे. या स्मृतीस्थळरुपी पंढरीत पोचल्यानंतर स्वर्गिय बाळासाहेबांचे दर्शन घेऊन त्यांच्यासमोर तमाम शिवसैनिकांचा प्रतिनिधी म्हणून मी शिवसेनेच्या अखंडतेसाठी साकडं घालणार आहे. दादा कोंडके यांनी जसे शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून काम केले तसेच काम त्यांच्यानंतर उत्तम शिंदे यांनी स्वर्गिय बाळासाहेबांच्या आशिर्वादाने केले आहे. राज्यात विविध निवडणुकीवेळी हे काम गेल्या 20 वर्षापासून अव्याहत सुरुच आहे. माझ्या शिवसेनेला ग्रहण लागलं म्हणून पायी चालत निघालोय, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Nana Patole : महाविकास आघाडीने OBC आरक्षणासाठी प्रयत्न केला, त्याचं हे यश आहे – नाना पटोले
- Shivaji Adahrao Patil : पुढील 15 दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत येणार; आढळराव पाटलांचं सर्वात मोठं विधान
- Riteish Deshmukh | वडील मुख्यमंत्री असताना मी सेक्स कॉमेडीमध्ये काम केलं- रितेश देशमुख
- IND vs WI : पहिल्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट, खेळाडूंना ‘असा’ करावा लागला सराव; पाहा VIDEO!
- Nitesh Rane : “राज्यावर धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची वेळ…”, नितेश राणेंचे सूचक ट्वीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

