Share

Yashomati Thakur | यशोमती ठाकुर यांनी गणरायाकडे घातलं ‘हे’ साकडं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या सगळीकडे आनंदाचं, शांती, मंगलमय वातावरण आहे. कारण सर्वांच्या घरी आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा आले आहेत. गणेशोत्सव हा सण सगळीकडे खूप उत्साहात साजरा केला जातो. संपूर्ण सृष्टीचा पालनकर्ता, विग्घहर्त्याचा हा सण असतो. सर्वसामान्यांपासून ते मोठं मोठ्या माणसांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन होतं असते. अनेकजण बाप्पाकडे आपली एक इच्छा व्यक्त करत असतात. जेणेकरून ती इच्छा त्याने पूर्ण करावी. यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश होतो. अशातच काँग्रेस पक्षाच्या नेत्या, महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आणि अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही गणरायाकडे एक साकडं घातलं आहे.

यशोमती ठाकूर यांचे गणारायाकडे साकडं-

निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सर्वांसाठी आनंदी आणि सुखाचा गणेशोत्सव साजरा होऊ देत, असं साकडं त्यांनी गणरायाकडे घातलं आहे. त्याचबरोबर त्यांनी गणेशोत्सवातील आपल्या लहानपणीच्याही काही आठवणी सांगितल्या असल्याचं समजतं आहे. यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या घरी यावेळी हत्तीवर बसलेल्या गणरायाच देखावा केला आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, या वर्षीचा गणेशोत्सव त्याच्यासाठी खूप खास असून, येत्या दोन तीन महिन्यांमध्ये प्रेक्षकांना त्यांचे नवीन कामही पाहता येणार असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे.

निर्बंधमुक्त गणेशोत्सव-

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे गेली दोन वर्ष गणेशोत्सव सर्व निर्बंध पाळून साजरा करण्यात आला. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त साजरा करता येत असल्यामुळे सर्वच गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहायला मिळत आहे. हा आनंद पुढचे सात दिवस आपल्या पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!