Share

Ambadas Danave | अमित शहांनी मुंबईवर बेगडी प्रेम दाखवलं – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे  सगळीकडे आनंदमय वातावरण आहे. राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत आहेत. अशातच भाजप पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईमध्ये लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. याच मुद्यावरून शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अंबादास दानवे यांचे वक्तव्य-

अमित शहा गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत. मात्र मुंबईवर बेगडी प्रेम दाखवायचे काम त्यांनी केले आहे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ला केला आहे. आज अंबादास दानवे नाशिक दैऱ्यावर असून, त्याठिकाणी त्यांनी नुकसानग्रस्त वंजारवाडी गावात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र सोशिक राहिला आहे. या सर्वांवर महाराष्ट्र मात करेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून, सत्ताधारी नेत्यांवरही अंबादास दानवे यांनी हल्ला केला आहे. बुलेट ट्रेनच्या कामासाठी येण्यापेक्षा नेते मंडळींनी शेतकऱ्यांच्या वावरात यावे, असं म्हणत
शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दानवे यांनी दिले आहेत.

पुढे ते असंही म्हणाले की, मुंबईतील अनेक कार्यालये दिल्लीला हलवली असती तर समजू शकलो असतो, मात्र ती अहमदाबादला हलवण्यात आली. याचा अर्थ मराठी माणसांवरचे प्रेम आणि मुंबईचे महत्त्व कमी करून अहमदाबादला ते देण्याचे काम सुरू आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकाही केली असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!