Share

County Cricket : चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये डंका, ३ द्विशतकं झळकावून मोडला ११८ वर्षांचा विक्रम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. मंगळवारी ससेक्स संघासाठी प्रथमच कर्णधारपद सांभाळणाऱ्या पुजाराने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक झळकावले. काउंटी चॅम्पियनशिपमधील पुजाराचे हे तिसरे द्विशतक ठरले आहे. या शानदार खेळीमुळे पहिल्या डावात पुजराच्या नेतृत्वातील ससेक्स संघाने ५२३ धावा केल्या.

मिडलसेक्सविरुद्ध खेळणाऱ्या ससेक्स संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ४ बाद ३२८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. एका बाजूने गडी बाद होत राहिले पण एका बाजूने पुजाराने आपली खेळी सुरू ठेवली. ३६८ चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याने १९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले द्विशतक पूर्ण केले. पुजाराने ४०३ चेंडूंचा सामना करताना २१ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३१ धावा ठोकल्या.

११८ वर्षांचा इतिहास बदलला

ससेक्स संघाच्या इतिहासात ११८ वर्षात एकाच मोसमात तीन द्विशतके झळकावणारा पुजारा पहिला फलंदाज ठरला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वी पुजाराने दोन द्विशतके झळकावली होती. डर्बीशायरविरुद्ध त्याने ३७८ चेंडूत २०१ धावा केल्या होत्या. यानंतर डरहमविरुद्ध ३३४ चेंडूत २०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता मिडलसेक्ससोबत खेळताना २३१ धावांची खेळी खेळली.

पुजाराची दमदार कामगिरी

या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ससेक्सकडून खेळताना पुजाराने या मोसमात पाच शतके झळकावली आहेत. यातून त्याने तीनवेळा आपल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर केले आहे. तर एक वेळा १७० धावा केल्या होत्या, ही त्याची नाबाद खेळी होती. आतापर्यंत पुजाराने ७ सामन्यांच्या १० डावांमध्ये १२४ च्या अतुलनीय सरासरीने एकूण ९९७ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!