Share

Supriya Sule | “जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच”

Published On: 

🕒 1 min read

पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून महाविकास आघाडीमधील पक्षनेते आणि शिंदे गट यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचं वातावरण आहे. राजकीय नेते एकमेकांच्या घरी गणपती दर्शनाला जात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचंही नावं येतं. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य-

गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. ज्या उत्साहाने आमचं सरकार पाडलं त्या उत्साहाने कामे होत नसल्याचं.

तसेच, पुढे त्या असंही म्हणाल्या की राजज्यात कुठेही पालकमंत्री नाहीत. कोव्हिड असो किंवा नसो अजित पवार सकाळी 6 वाजल्यपासून काम करत असायचे. त्यांच्यासोबत सर्व प्रशासन काम करत होते. दर शुक्रवारी त्यांच्या मॅरेथॉन मिटिंग व्हायच्या. आता पालकमंत्रीच नाहीत. त्यामुळे कामेही होताना दिसत नाहीत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!