मुंबई : आज सगळ्यांच्या घरी गणेशाचे आगमन झाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर एकदम ठाटामाटामध्ये गणेशा सर्वांच्या घरी आले आहेत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचं, सुख, शांतीचं वातालरण निर्माण झालं असलेलं पाहायला मिळतं आहे. तसेच सर्व राजकीय नेत्यांच्या घरी देखील बाप्पाच आगमन झालं आहे. अशताच काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गणराया समोर एक सवाल विचाराला आहे.
नाना पटोले यांचा गणरायासमोर सवाल-
देशातील मूठभर लोकच श्रीमंत होत आहेत तर एक मोठा वर्ग गरीबीच्या खाईत लोटला जातोय. यासाठी जे जबाबदार आहेत. देशातील महागाई, बेरोजगारीसाठी जबाबदार असणाऱ्यांना गणराय चांगली बुद्धी देवो, हीच आजच्या दिवशी प्रार्थना आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांनी विरोधकांना खडसावलं आहे. नाना पटोले यांच्या घरी आज गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते.
काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता आणि राहणार-
देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा प्रवाह नेण्याची काँग्रेसची योजना होती. मात्र मागील सात आठ वर्षात ती खंडित झाली, त्यामुळेच हे हाल झाले आहेत. यासाठी जबाबदार कोण आहे?. त्याचं नाव मी आज घेणार नाही, कारण आजच्या दिवशी राजकारण नको, असंही नाना पटोले यांनी म्हणटलं आहे. तसेच,काँग्रेस हा देशातील सर्वात मोठा पक्ष होता आणि तो राहणार असल्याचं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
काय तमाशा झालाय हे सर्वांनाच माहित आहे-
पुढे ते महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना संबोधताना ते म्हणाले की, गोवाहटीत काय तमाशा झालाय हे सर्वांनाच माहिती आहे. हे नेते सध्या सत्ता एंजॉय करतायत. पण नेमकं प्रदुषण कुणी केलं हेही अनेकांना ठाऊक आहे.
महत्वाच्या बातम्या :
- आज IND vs HK सामना! चार वर्षांपूर्वी हाँगकाँगच्या सलामी जोडीने उधळला होता भारताचा डाव
- Shahajibapu Patil | ‘…मग ठरेल शिवसेना पुढे की, भाजप पुढे’; शहाजीबापू पाटील
- Ganesh Chaturthi | कोणत्या शुभ मुहर्तावर येणार लाडके गणपती बाप्पा, कधी अन् कशी करावी पूजा, जाणून घ्या
- Jharkhand | महाराष्ट्रासारखं सत्तासंकट आता झारखंडमध्ये! मुख्यमंत्री वेळीच सावध, आमदारांना घेऊन गाठले छत्तीसगड
- Eknath Shinde | पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करतील?, एकनाथ खडसे यांनी केलं स्पष्ट


