Share

Chandrakant Khaire : “मी त्यांना हिरवा साप म्हणायचो ,आता…” ; चंद्रकांत खैरेंची अब्दुल सत्तारांवर जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आणि एकनाथ शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या मालिका सुरू आहेतच. अशातच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. औरंगाबाद मध्ये शिवसेनेने शक्ती प्रदर्शन करण्यासाठी वाहन रॅली काढली होती. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जहरी शब्दांत टीका केली आहे.

शिवसेनेतून बंड पुकारलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेत आणलं अशा प्रकारचं खळबळ जनक विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. “जेव्हा मी सिल्लोडमध्ये भाषण करायचो तेव्हा मी त्यांना जाहीर सभेत हिरवा साप म्हणायचो.  मात्र आता ते रंग बदलणारा काळा सरडा झाले आहेत” अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर केली आहे.

त्याचबरोबर बंडखोर आमदार तिथे जाऊन ऐशोआरामात राहत आहेत.  झाडे आहेत, डोंगर आहेत, पाणी आहे असं सांगत आहेत. पण इथं लोकांना अनेक ठिकाणी प्यायला पाणी देखील नाही.  तलाव रिकामे पडले आहेत. काही ठिकाणी शेतकरी त्यांच्या मतदारसंघाला त्रासले आहेत असं खैरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर आपण का गेला नाहीत असा सवाल चंद्रकांत खैरे यांना माध्यमांनी विचारला. यावर आम्ही बंडखोरांच्या कार्यालयावर गेलो होतो पण पोलिसांनी जाण्यास मनाई केली असे स्पष्टीकरण खैरे यांनी दिलं. सेना स्टाईल ने आम्ही त्यांना दाखवून देऊ असा इशाराही खैरे यांनी यावेळी दिला.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!