Share

Vijay Shivtare : मोठी बातमी : माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे गटात जाणार

Published On: 

मुंबई : राज्यातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शिवसेनेचे जवळपास ३९ आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. काल रात्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. 30 जून रोजी महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला बोलावावे, असं पत्र फडणवीसांनी दिले आहे.

यानंतर पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (गुरूवारी) पर्यंत राज्यपालांनी मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारसाठी गुरूवारचा दिवस निर्णायक ठरणार आहे. यानंतर आता शिवसेनेला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील कामे होत नाहीत, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती तोडावी अशी भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन विजय शिवतारे यांनी जाहीर केली.

विजय शिवतारेच्यां भूमिकेमुळे शिवसेनेला पुणे जिल्ह्यात मोठ खिंडार पडणार आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे ती संघटनेसाठी आहे, आम्ही एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं क्रम प्राप्त आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस बरोबर जाऊ नका अशी विनंती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व जणांनी उद्धव ठाकरेंना केली होती पण दुर्दैवाने एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला दाद मिळाली नाही, असं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!