🕒 1 min read
गुवाहाटी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे 52 आमदार सोडले, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्यास ते तयार नाहीत. बंडखोर आमदार संधिसाधू नसून पक्षासाठी आणि त्यांच्या नेत्यासाठी परिस्थिती नसतानाही सर्व काही केले, असे म्हणत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
बंडखोर आमदारांना संबोधित करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान सोडले, त्यांनी 52 आमदार सोडले, त्यांनी सर्व सोडले, पण त्यांनी शरद पवारांना सोडले नाही. त्यासाठी ते तयार नाहीत.”
गुलाबराव पाटील म्हणाले, “आजवर अनेक सभा गाजवून शिवसेनेचा विचार सर्वदूर पोहचवला. एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून इथंपर्यंत आलो आहोत. आपल्यावर भरपूर टिका झालेल्या आहेत. कधी प्रेत काढू तर तुमचे बाप किती, आमच्या जिवनाचा संघर्श कोणाला माहित नाही. 302 काय असते हे संजय राऊत यांना माहित नाही आहे. तडीपार काय असतं हे देखील त्यांना माहित नाही. हे सगळे बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेले आहेत. संजय राऊत यांनी 47 अंस सेल्सियस तापमानात जळगावमध्ये 35 लग्न लावावे मी त्यांना बहाद्दर म्हणुन समजून घेईल.”
संजय राऊतांनी केला होता घणाघात-
“बंडखोरांना अनेक बाप आहेत. आमचा एकच बाप बाळासाहेब ठाकरे आहेत. तिथून बसून ते सांगत आहेत की तिथलं वातावरण खूप चांगलं आहे. समोर डोंगर आहे वगैरे वगैरे… महाराष्ट्रात स्मशानभूमी आहे का? तिथे भाजपच्या पैशावर पार्टी करत आहेत. आता तुमच्या दिल्लीच्या बापाच्या नावाने मते मागा,” असे आव्हान संजय राऊत यांनी केले होते.
बरं झाली घाण गेली-
आदित्य ठाकरे यांनी देखील बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला होता. बरं झाली घाण गेली, असे आदित्य ठाकरे म्हणाले होचे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती? असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला होता.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आमदारांच्या गटाने केलेल्या बंडानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या बंडखोर आमदारांच्या गटात गुलाबराव पाटील यांचाही समावेश आहे. हे आमदार उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडण्याचा आग्रह करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
