Share

VIDEO : ‘‘मोदींना भेटल्यावर कसं वाटलं?”, पंतप्रधानांविषयीच्या प्रश्नाला दिग्गज क्रिकेटर मिताली राजनं दिलं ‘असं’ उत्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू (mithali raj) मिताली राज सध्या तिच्या बायोपिक ‘शाबाश मिठू’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तापसी पन्नू मिताली राजची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १५ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत मिताली आणि तापसी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आहेत.
दरम्यान या दोघी रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर-2’मध्ये पोहोचले. या कार्यक्रमात एका सहभागीने मितालीला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल प्रश्न विचारला. यावर मितालीने काय म्हटले हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

कार्यक्रमादरम्यान एका महिला सहभागीने विचारले, ”मिताली, जेव्हा तू पहिल्यांदा पंतप्रधान मोदींना भेटलीस तेव्हा तुला कसे वाटले? तुझी भावना काय होती?” यावर मितालीने उत्तर दिले, ”२०१७च्या विश्वचषकानंतर जेव्हा आम्ही परत आलो, तेव्हा विमानतळावर आमचे स्वागत झाले आणि पंतप्रधान मोदींनीही आम्हाला वेळ दिला.”

मिताली म्हणाली, ”पीएम मोदी प्रत्येक खेळाडूला त्याच्या नावाने ओळखतात. तसेच प्रत्येक खेळाडूच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्ही अंतिम फेरीत हरलो तरीही पंतप्रधानांनी राष्ट्रीय संघाचे कौतुक करण्यासाठी वेळ दिला हा आमच्यासाठी सन्मान होता. त्यांनी एक गोष्ट सांगितली की, हरल्यानंतरही तुम्ही सर्वांची मने जिंकली. त्यांनी सांगितलेल्या या गोष्टीने आम्हाला चांगला खेळ दाखवण्यासाठी खूप प्रेरणा दिली.”

मितालीच्या उत्तरावर न्यायाधीश हिमेश रेशमिया, जावेद अली आणि शाबाश मिथू अभिनेत्री तापसी पन्नू यांनीही टाळ्या वाजवल्या. भारतीय संघ २०१७च्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, विजेतेपदाच्या लढतीत इंग्लंडकडून संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बर्मिंगहॅमला गेला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये टी-२० स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारतीय संघ पदक जिंकेल अशी अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!