Share

Shiv Sena MP : मातोश्रीवरील बैठकीला ७ खासदार गैरहजर; शिवसेनेची धाकधूक आणखी वाढली

Published On: 

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत राज्यात भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेला मोठा झटका बसला. शिवसेनेत आता १५ आमदार उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार देखील बंडाच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला तब्बल ७ खासदार गैरहजर होते. त्यामुळे शिवसेनेचे काही खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चांना उदान आले आहे.

शिवसेनेत आमदारांनी बंड पुकारल्यानंतर पक्षाचे खासदारही शिंदे गटात जाणार असल्याचा बातम्या समोर येत होत्या. शिंदे गटातील अनेक बंडखोर आमदारांनीही पक्षातील खासदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. तसेच भाजपने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेल्या द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली होती. त्यामुळे पक्षप्रमुखांनी खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला तब्बल ७ खासदार गैरहजर राहिल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या मातोश्री वरील बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये भावना गवळी – यवतमाळ वाशिम, हेमंत जाधव – परभणी, संजय महाडिक – कोल्हापूर, हेमंत पाटील – हिंगोली, श्रीकांत शिंदे – कल्याण-डोंबिवली, कृपाल तुमाने – रामटेक, कलाबेन डेलकर – दादरा-नगर-हवेली अशी नावे समोर आली आहेत. त्यामुळे हा आता शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख व प्रमुख नेते पक्ष बांधणीची कामे करत आहेत. तर दुसरीकडे पक्षातील कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.

उपस्थित खासदार
१.गजानन कीर्तिकर
२.अरविंद सावंत
३.विनायक राऊत
४.हेमंत गोडसे
५.धैर्यशील माने
६. प्रताप जाधव
७. सदाशिव लोखंडे
८. राहुल शेवाळे
९. श्रीरंग बारणे
१०. राजन विचारे
११) ओमराजे निंबाळकर
१२) राजेंद्र गावीत

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!