मुंबई: सुप्रीम कोर्टाने राज्यातील प्रकरणावर तात्काळ सुनावणी करणे शक्य नसल्याचे म्हटले असून जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची कारवाई पुढे ढकलावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. यावर आता शिवसेना तसेच शिंदे गटातील नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी कोर्टातील लढाई आम्हीच जिंकणार असल्याचा दावा केला आहे.
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेचा आज फेसला होणार होता, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे हा निर्णय आमच्या बाजूने लागणार, तसेच आम्ही चुकीचं काही केलं नाही, आमचा न्यायालयावर विश्वास आहे. असे गोगावले यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनचे अजून किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत या प्रश्नावर गोगावले म्हणाले कि, काही खासदार मुख्यमंत्री यांच्या संपर्कामध्ये असू शकतात याबाबत मला माहिती नाही. खासदार जर स्वतः शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असतील तर त्याबाबत शिंदे साहेब ठरवतील.
महत्वाच्या बातम्या:
- Shiv sena : “धनुष्यबाणाबाबत आमची बाजू ऐकल्याशिवाय…” ; शिवसेनेची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव
- Shiv Sena MP : मातोश्रीवरील बैठकीला १० खासदार गैरहजर; शिवसेनेची धाकधूक आणखी वाढली
- Ramdas Athawale | “शिंदे आणि फडणवीस यांची जमलेली आहे जोडी…” ; रामदास आठवलेंची सरकारच्या भवितव्यावर प्रतिक्रिया!
- Narendra Modi : संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण
- Shankarrao Gadakh : शिंदे गटाबद्दल शंकरराव गडाखांचा मोठा गौप्यस्फोट, कोर्टाच्या निकालानंतरच घेणार निर्णय!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

