🕒 1 min read
मुंबई : विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या (ENG vs IND) अंतिम टी-२० सामन्यातही कायम राहिली. असे असूनही, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा माजी कर्णधार कपिल देव यांच्या संघातील स्टार फलंदाजांच्या स्थानाबाबत केलेल्या टिप्पणीशी असहमत आहे. रोहित म्हणाला, ”ते तज्ञ बाहेरून खेळ पाहत आहे आणि आत काय चालले आहे ते कळत नाही. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये विराटला केवळ १२ धावा करता आल्या.”
कपिल देव यांनी अलीकडेच एका निवेदनात म्हटले होते, की जेव्हा क्रमांक दोनचा गोलंदाज असलेल्या आर अश्विनला कसोटी संघातून वगळले जाऊ शकते, तर विराट कोहलीला टी-२० संघातून का वगळले जाऊ शकत नाही. तो सेटअपमध्ये बसत नाही. “जर विराट कामगिरी करत नसेल तर तुम्ही या मुलांना दीपक हुडा सारख्या तरुणांना बाहेर ठेवू शकत नाही.”
https://twitter.com/RevSportz/status/1546213021626028032
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, “तज्ञ बाहेरून खेळ पाहतात आणि आत काय चालले आहे हे त्यांना कळत नाही. आमची स्वतःची विचार प्रक्रिया आहे. आम्ही आमचा संघ बनवतो आणि त्यामागे खूप विचार आहे. आम्ही खेळाडूंना पाठिंबा देतो आणि संधी देतो. अशा परिस्थितीत तुम्हाला या गोष्टी बाहेरून कळत नाहीत. त्यामुळे बाहेर काय चाललंय हे महत्त्वाचं नसून आत काय घडतंय हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
