नवी दिल्ली : साऊथ फिल्म इंडस्ट्री ते नॅशनल क्रश असा प्रवास करणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मंगळवारी तिचा २६ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी तिचे चाहते तिला वेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा जन्म 5 एप्रिल 1996 रोजी कर्नाटकातील विराजपेट येथे झाला. तिने आपल्या एक्टिंग करियरची सुरुवात कन्नड चित्रपटातून केली, त्यानंतर तिने तेलुगु चित्रपटसृष्टीत ही पदार्पण केले. रश्मिकाने म्हैसूर इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स अँड आर्ट्समधून प्री युनिव्हर्सिटी कोर्स करण्यासोबतचं पत्रकारिता आणि इंग्रजी लिटरेचरमध्ये ग्रेजुएशन केले आहे.
रश्मिका मंदान्नाने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला कधीही अभिनेत्री व्हायचे नव्हते, पण योगायोगाने ते झाले. मी कधीही अभिनय शाळेत शिकले नाही किंवा चित्रपटांसाठी कधी ऑडिशन दिले नाही. तिच्या जबरदस्त एक्टिंग, एक्सप्रेशन आणि क्यूटनेसमुळे लोक तिला नॅशनल क्रश या नावाने हाक मारू लागले.
महत्वाच्या बातम्या :
राज ठाकरेंच्या घरी नातवाचे आगमन ; अमित ठाकरे झाले बाबा
“छत्रपती संभाजी महाराजांचे अश्रू हे निखाऱ्याचं स्वरूप घेतील”- आशिष शेलार
मास्टर ब्लास्टरने पुन्हा अनुभवला मुंबईतील ‘बालपणीचा काळ’; ‘बेस्ट’चे फोटो केले चाहत्यांसोबत शेअर
“संजय राऊत यांना घोड्यावरून तुरुंगात पाठवा”; नितेश राणेंचं टीकास्त्र
मिका सिंग भगवंत मान यांची भेट घेऊन म्हणाला, मला वाटले होते तुम्ही बदलाल, पण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

