औरंगाबाद : ढगाळ वातावरणामुळे कांदा बीज उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, हे चित्र औरंगाबाद मध्ये -पाहायला मिळत आहे. ढगाळ आणि दमट वातावरणामुळे शेतकरी अडकला आहे.
जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात पाहिले तर जैतपूर तांडा येथील शेतकरी आपल्या शेतीत ९० टक्के कांदा बीज उत्पादनाची शेती करत आहेत. कांदा बिजोउत्पादनाची मागणी अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना यामध्ये आर्थिक फायदा चांगला होतो. त्यामुळे येथील शेतकरी बिजोउत्पादनाची शेती अहिक प्रमाणात करतात. शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ८५ हजार ते एका लाखाच्या जवळपास कांद्याच्या बियाण्याला मागणी असते. त्यामुळे जैतपुर तांडा येथी शेतकऱ्यांचा कांदा बिजोत्पादन शेतीकडे जास्त कल आहे. परंतु औरंगाबाद येथील कांदा बीज उत्पादनाची शेती रखडली आहे. त्याव्र्र सध्या वातावरण बदलाचा परिणाम होत असताना दिसत आहे.
कांदा बीजोत्पादन शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ नफा ऐवजी तोट्यात जमा होण्याची शक्यता दिसत आहे. कांदा बीजोत्पादक शेतकरी हतबल झाले असल्याचे दिसत आहेत. शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादन शेतीला शासनाने पीक विम्यात सहभागी करून झालेली नुकसान भरपाई भरून द्यावी अशी मागणी केली आहे. शासन कोणता निर्णय घेईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

