🕒 1 min read
मुंबई: सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने आरोप केला आहे की केरळ क्रिकेट असोसिएशनने (KCA) त्याची फेअरवेल सामना खेळण्याची इच्छा नाकारली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये मेघालय विरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात श्रीशांतने राज्याचे शेवटचे प्रतिनिधित्व केले होते. केरळने हा सामना एक डाव आणि १६६ धावांनी जिंकला. ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या.
निवृत्तीनंतर दिलेल्या एका मुलाखतीत श्रीशांतने (s sreeshant) सांगितले की, “रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मी उत्सुक होतो. खेळापूर्वी झालेल्या सांघिक बैठकीत मी केरळसाठी हा माझा शेवटचा सामना असल्याचे स्पष्ट केले होते. मला विश्वास आहे की मी फेअरवेल सामन्यासाठी पात्र होतो.” श्रीशांतने त्याच्या संघर्षमय कारकिर्दीवर पडदा टाकला असला तरी त्याला विश्वास आहे की तो अजूनही १३० किमी प्रतितास वेग पकडू शकतो. ” मी अजूनही १३२ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो. मी कोणत्याही १९ वर्षांच्या गोलंदाजाप्रमाणे वेगाने गोलंदाजी करू शकतो. तथापि, मला पात्र तरुणाची जागा खाण्याची इच्छा नाही,” त्याने सांगितले.
आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना, श्रीशांत म्हणाला की, “मी जगभरातील फ्रेंचायझी-आधारित लीग खेळण्यास तयार आहे. मला काही कोचिंग ऑफरही मिळाल्या आहेत. तसेच, मला माझ्या चित्रपट कारकिर्दीवरही लक्ष केंद्रित करायचे आहे. माझा तमिळमधील पहिला चित्रपट एप्रिलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी याआधी केम्पेगौडा २ नावाच्या कन्नड चित्रपटात काम केले आहे,” श्रीशांतने २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, त्याने अनुक्रमे ८७, ७५ आणि सात विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या
- “स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड”, प्रवीण चव्हाणांचा आरोप
- Women’s WC 2022: हरमनप्रीत कौरचे धमाकेदार शतक; विश्वचषकात भारताच्या पहिल्यांदाच ३०० धावा
- ‘मंत्री पदाची पर्वा नाही, उद्याच राजीनामा देतो’ – राज्यमंत्री बच्चू कडू
- महावितरणकडून शिबिरांचे आयोजन, शेतकऱ्यांची वाढीव वीजबिले दुरुस्त होणार!
- “अब अनिल परब का नंबर भी आयेगा”, किरीट सोमय्यांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
