🕒 1 min read
मुंबई: भारतीय क्रिकेटचा देवमाणूस सचिन तेंडुलकरने सोमवारी मुंबईच्या प्रतिष्ठित ‘BEST’ बसमधील फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत मुंबईत बसमधून प्रवास करताना आपल्या बालपणीचे दिवस आठवले. मुंबई ‘बेस्ट’ बसेस अत्यंत सोयीस्कर आणि स्वस्त वाहतुकीचे साधन म्हणून मुंबईतील नागरिकांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. या बसेस उपनगरांसह संपूर्ण शहराला जोडतात. म्हणूनच, लहानपणी सचिन सराव आणि सामन्यांमधून परत येताना वारंवार यातून प्रवास करायचा.
सचिन तेंडुलकरने (Sachin tendulkar) त्याच जुन्या बालपणीच्या आठवणी जाग्या करत त्याच्या इंस्टाग्राम पोस्टला कॅप्शन दिले, “बालपणाकडे परत” यात त्याने बेस्ट मध्ये बसलेले चार फोटो टाकले आहे. ज्यात तो दिलखुलासपणे हसताना आनंदी दिसत आहे. लोकल ट्रेनला मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. पण केवळ लोकलच नव्हे तर बेस्ट ही मुंबईकरांच्या जीवनाचा एक आधार आहे.
सचिनच्या या ‘बेस्ट’ प्रवास चाहत्यांना भावला आहे. त्याच्या या फोटोला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. सचिन तेंडुलकर सध्या IPL 2022 साठी मुंबई इंडियन्स (MI) कॅम्पचा भाग आहे. तो संघाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- किरीट सोमय्या चु*** माणूस; संजय राऊत संतापले
- IPL 2022 RCB vs RR: युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना आहे स्पेशल! तब्ब्ल आठ वर्षांनी घडणार ‘अशी’ गोष्ट
- मुस्लिमांची प्रतिमा डागाळण्याची भीती, ‘या’ चित्रपटावर घालण्यात आली बंदी
- IPL 2022 RCB vs RR: मॅक्सवेल संबधी मोठी अपडेट! आज राजस्थान विरुद्ध मैदानावर उतरणार?
- अजित पवारांना ‘मुतऱ्या तोंडाचे’ म्हणत शिवसेनेनं केली होती जहरी टीका! आता मात्र बदललीय भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
