मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक आनंदाची बातमी मिळाली आहे. राज ठाकरे आजोबा झाले आहेत. राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना पूत्रलाभ झाला आहे.
अमित ठाकरे यांची पत्नी मिताली ठाकरे यांनी गोंडसच्या बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या दादर येथील घरी उत्साहाचे वातावरण आहे. अमित आणि मिताली 27 जानेवारी 2019 दिवशी विवाहबंधनात अडकले होते. हे त्यांचं पहिलं अपत्य आहे.
मनसैनिकांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राज ठाकरे यांची आजोबा झाल्यावर काय प्रतिक्रिया असेल यावर कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. राज ठाकरे आजोबा झाल्यानंतर सर्वच क्षेत्रातील मंडळींनी राज ठाकरे आणि मुलाचे बाबा अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रबोधनकारजी ठाकरे, श्रीकांतजी ठाकरे, राजजी ठाकरे, अमितजी ठाकरे या राजसाहेबांच्या परिवारातील चार पिढया महाराष्ट्राने अनुभवल्या आहेत, याच कुटुंबात जन्माला आलेल्या नवीन पिढीच्या या बालकाला 4 पिढ्यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. ते म्हणतात ना “पुण्य हवे नशिबाला” अगदी तसेच. अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
राज ठाकरे हे आपल्या नातवाचं नाव काय ठेवतात, याबद्दलही सगळ्यांना उत्सुकता लागल्याचं सोशल मीडियावर दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
“छत्रपती संभाजी महाराजांचे अश्रू हे निखाऱ्याचं स्वरूप घेतील”- आशिष शेलार
मास्टर ब्लास्टरने पुन्हा अनुभवला मुंबईतील ‘बालपणीचा काळ’; ‘बेस्ट’चे फोटो केले चाहत्यांसोबत शेअर
“संजय राऊत यांना घोड्यावरून तुरुंगात पाठवा”; नितेश राणेंचं टीकास्त्र
मिका सिंग भगवंत मान यांची भेट घेऊन म्हणाला, मला वाटले होते तुम्ही बदलाल, पण
किरीट सोमय्या चु*** माणूस; संजय राऊत संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

