Share

महाराष्ट्राची आधुनिक शांताबाई! सनी लियोनी थिरकणार ‘शांताबाई’ गाण्यावर..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीनं बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केल्यानंतर आता तिनं प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनी आता मराठीतील आणखी एका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. संजीव कुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘आमदार निवास’मध्ये ‘शांताबाई’ या लोकप्रिय मराठी गाण्यावर ती आयटम सॉंग करताना दिसणार आहे.

सनीने यापूर्वी ‘बॉईज’ या मराठी चित्रपटामध्ये ‘कुठं कुठं जायच हनिमूनला’ या आयटम सॉंगद्वारे मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. यानंतर आता ती लवकरच ‘आमदार निवास’ या चित्रपटात झळकणार आधुनिक ‘शांताबाई’ च्या रूपानं भेटणार आहे. मराठी रसिकांना सनीच्या गाण्याची प्रतीक्षा आहे.

सन २०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ कोटींहून जास्त व्ह्यूज असून यामध्ये महाराष्ट्राची आधुनिक ‘शांताबाई’ म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी या आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिक टच दिला आहे.’आमदार निवास’ हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!