Share

भारतीय क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना अटक; ‘या’ कृत्यामुळे बराच काळ होते फरार!

Published On: 

मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत २०१३मध्ये झालेल्या सुमारे १.२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी माजी क्रिकेटपटू नमन ओझाचे वडील व्हीके ओझा यांना सोमवारी अटक केली. ओझा यांच्यावर कलम ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०बी, ३४ आणि आयटी कायद्याच्या कलम ६५, ६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील इतर आरोपींना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. ओझा बराच काळ फरार होते. एसडीओपी मुलताई नम्रता सोंढिया यांनी सांगितले की, या घोटाळ्यातील फरार आरोपी विनय ओझा यांना अटक करण्यात आली आहे.

२०१३ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत जौलखेडा येथे कार्यरत बँक व्यवस्थापक अभिषेक रत्नम यांनी गंडा घालण्याचा कट रचला होता. त्याच्या बदलीनंतर, ओझा आणि इतरांनी मिळून रविवार, २ जून २०१३ रोजी ३४ बनावट खाती उघडून त्यावर केसीसी कर्ज हस्तांतरित केले आणि सुमारे १.२५ कोटी रुपये काढले. हा घोटाळा झाला तेव्हा विनय ओझा हे बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. माजी व्यवस्थापक अभिषेक रत्नम, विनोद पनवार, लेखापाल नीलेश चलोत्रे, दीनानाथ राठोड यांच्यासह ओझा यांनी ही रक्कम वाटप केली होती.

सुमारे वर्षभरानंतर तत्कालीन शाखा व्यवस्थापक रितेश चतुर्वेदी यांनी १९ जून २०१४ रोजी पोलीस ठाण्यात गंडा घालण्याची तक्रार केली होती. बनावट नाव व फोटोच्या आधारे किसान क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून रक्कम काढण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरोडा येथील वृद्ध रहिवासी दर्शनचे वडील शिवलू यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या नावावर खाते उघडून पैसे काढण्यात आले. अन्य शेतकऱ्यांच्या नावे किसान क्रेडिट कार्ड बनवून सुमारे १.२५ कोटी रुपये काढण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!