Share

“शिवबंधन धाग्याची एक्सपायरी डेट संपली की..” ; केशव उपाध्येंचा खोचक टोला

Published On: 

मुंबई :  राज्यात १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केले जात आहे. राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दरम्यान या निवडणुकीत मतांसाठी दोन्ही बाजूकडून आमदारांची जुळवाजुळव होताना दिसत आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षातील आमदारांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. अशातच शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना एकेठिकाणी जमवले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलवली आहे. शिवसेनेच्या आमदारांना बैठकीसाठी येताना हॉटेलमध्ये राहण्याच्या तयारीनीशी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व आमदार एकाच ठिकाणी सुरक्षित आणि एकत्र रहावेत यासाठी शिवसेनेकडून आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. आमदारांना एकत्र ठेवल्याने यावर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला उद्देशून खोचक पोस्ट लिहिली आहे.

केशव उपाध्ये आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, “शिवबंधनावर अविश्वास? राज्यसभा निवडणुकीसाठी मोठमोठे दावे करत दुसरा उमेदवार देणाऱ्या शिवसेनेची सध्या पुरती झोप उडाली आहे. पराभव समोर दिसत असल्याने सैरावैरा पळून मतांची बेगमी करताना शिवसेनेच्या बड्या नेत्यांची फे फे उडताना दिसत आहे. दरम्यान, अपक्ष आणि छोट्या पक्षांची गोळाबेरीज मांडताना स्वत:च्या पक्षाचेच आमदार शिवसेनेच्या उमेदवारांना मत देणार की नाही, याची भीती सेनापतींना वाटत आहे. त्यामुळेच आमदारांना नजरकैदेत ठेवून पहारे देण्याची तयारी सेना नेतृत्वाने केली आहे. स्वत:ला वाघ म्हणवून घेणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना अशाप्रकारे नजरकैदेच्या पिंजऱ्यात ठेवण्याची आलेली वेळ म्हणजे पक्षप्रमुखांच्या विचारांचा पराभव आणि जनतेतून निवडून आलेल्या आमदारांचा अपमान आहे. यावरून शिवसेना नेतृत्वाचा स्वपक्षातील आमदारांवरच विश्वास नसल्याचं दिसून येत आहे. बाकी शिवबंधनाचा धागा बांधूनही सेना आमदार पक्षाविरोधात जाणार असतील तर त्या बंधनाला अर्थ काय? त्याची एक्स्पायरी डेट संपली की पक्षप्रमुखांच्या मुख्यमंत्री म्हणून निष्क्रीय कामगिरीमुळे आमदारांचा स्वपक्षावरील विश्वास उडाला?”

भाजपच्या मुख्य प्रवक्त्यांनी शिवसेनेच्या शिवबंधन या भावनिक मुद्द्यावर खोचकपणे टिप्पणी केली आहे. यामुळे हा घाव शिवसेनेच्या वर्मावर लागल्याचे बोलले जात आहे. आता यावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!