मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय नेत्यांनी विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करत मजल गाठली आहे. विशेष म्हणजे भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबावर खालच्या पातळींवर आक्षेपार्य वक्तव्य करत असते. यावरूनच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपाचे नेते किरीट सोम्मया, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, आमदार अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील व भाजप पाठींबा करत असलेली अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती यांना टार्गेट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट पत्र लिहिले आहे. दिपाली सय्यद यांनी हे पत्र ट्विटद्वारे शेअर केले आहे.
मोदींना लिहिलेल्या पत्रात दिपाली सय्यद काय म्हणाल्या ?
प्रति,
माननीय श्री. नरेंद्र मोदी साहेब.
पंतप्रधान भारत सरकार.
विषय: महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत मुख्यमंत्री व त्यांच्या कुटूंबावर वारंवार होणार्या अपशब्द, खालच्या पातळींवर होणार्या आक्षेपार्य विधानांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत….
माननीय महोदय,
गेले दहा महिन्यापासुन महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या कुटूंबावर वारंवार होणार्या अपशब्द, खालच्या पातळींवर होणार्या आक्षेपार्य विधानांबाबत आपणांस माहीती देऊ इश्चिते कि भाजपाचे नेते किरीट सोम्मया, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, आमदार अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील व भाजप पाठींबा करत असलेली अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती हे वारंवार जाणून बुजून मुख्यमंत्री व त्यांच्या कुटूंबावर खालच्या पातळींवर आक्षेपार्य विधाने करीत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना हि आरे ला कारे करणारी संघटना आहे तरी याबाबतीत भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीयेला उलट प्रतीउत्तर देण्याकरीता खुद्द देशाच्या पंतप्रधानांवर आम्हाला जशास तशी टिका करावी लागत आहे. त्याचे कारण असे कि या सर्व भूमिका आपल्या मार्गदशनाने घडवल्या जात आहेत असा संदेश महाराष्ट्रातील जनतेकडे किंवा शिवसैनिका पर्यंत पोहचत आहे तरी भारताचे पंतप्रधान आपण असुन सुद्धा आपल्यावरती टिका करणे किंवा जशास तसे उत्तर देण्यासाठी आपले आम्हाला नाव घ्यावे लागते या सर्व वर्तवणुकीमुळे बरेच आंदोलन व पोलिस तक्रार, खटले, जिवे मारण्याच्या धमक्या इत्यादी गोष्टींना सेना भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांना सामोरे जावे लागत आहे व या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडत आहे तरी आपण गेल्या २५ वर्ष युतीचा व शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून तात्काळ आपली भूमिका सर्व गोष्टींना पाठिंबा देते का हे “मन कि बात” याद्वारे व पत्राद्वारे स्पष्ट करावीत. आपली प्रतिक्रिया हि महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेला वेगळे वळण देणारी असेल आपण यांवर प्रतिक्रिया न दिल्यास हे असेच चालु राहुन कायदा व सुवस्था बिघडु शकते या मध्ये महाराष्ट्राचे नुकसान लक्षात घेऊन माझ्या पत्राची काळजीपूर्वक दखल घ्यावी हि नम्र विनंती.
आपली विश्वासु
दिपाली भोसले सय्यद.
दिपाली सय्यद यांचं ट्विट –
भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल! आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणा आगोदर महाराष्ट्रातुन तुमच्या दिल्ली PMO कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार ? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का? असे सवाल दिपाली सय्यद यांनी उपस्थित केले आहेत.
भाजप म्हणजे वादग्रस्त विधानांचा कळस म्हणावे लागेल ! आदरणीय मोदीजी, नुपूर शर्मा प्रकरणा आगोदर महाराष्ट्रातुन तुमच्या दिल्ली PMO कार्यालयात पोहचवलेल्या पत्राचे उत्तर कधी मिळणार ? महाराष्ट्रातील भाजप नेत्यांसाठी न्याय वेगळा करणार का?
@ShivSena pic.twitter.com/CKwjWgfVVL— Deepali Sayed (@deepalisayed) June 7, 2022
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

