Share

“…कचराकुंडीवर भारताच्या पंतप्रधानांचा फोटो लावणं अमान्य”- जितेंद्र आव्हाड

Published On: 

मुंबई :  भाजप प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठे वाद निर्माण झाले आहे. अरब देशांमधून नुपूर शर्मांच्या या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकीकडे एवढे घमासान सुरु असतानाच या दरम्यान आणखी एक नवा वाद सुरू झाला आहे. अरब देशातील संतप्त झालेल्या लोकांनी कचराकुंड्यांवर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. यामुळे आत भारतातूनही संताप व्यक्त केला जात आहे. देशातील विविध राजकीय पक्षांकडून, अनेक नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत याचा निषेध केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहेत. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या भारताच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला मान्य नाही या कृतीचा आम्ही निषेध करतो”

एका टीव्ही चर्चेत भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लामचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी आक्षेपार्ह व वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले होते. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची चिंता वाढवत आहे. सौदी अरेबिया, युएई या भारताच्या मित्र देशांसह अनेक देशांनी याचा निषेध केला असून भारताकडून कारवाईची मागणी केली आहे. अनेक देशांनी भारताच्या राजदूतांना बोलावून यावर उत्तर मागितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!