मुंबई : करोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. यामध्ये ताप, सर्दी, घसादुखी, डोकेदुखी या स्वरूपाच्या लक्षणांची तीव्रता वाढली आहे. ही लक्षणे करोना संसर्गाची आहेत का याची माहिती घेणे गरजेचे आहे. आता बुस्टर डोस घेण्याची वेळ आली आहे मात्र मुंबईसह इतर राज्यांमध्ये करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने बुस्टर डोस घेण्याची मोठी समस्या उद्भवू शकते.
माहितीनुसार, “राज्यात पहिली डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९ कोटी पाच लाख ६९ हजार ९९६ इतकी असून, दुसरी डोस घेणाऱ्यांची संख्या सात कोटी ३७ लाख ७० हजार २२३ इतकी आहे. तर राज्यात २९,२९,५७३ जणांनी बूस्टर डोस घेतली आहे. राज्यातील २७ जिल्ह्यामध्ये बूस्टर डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ७५ हजारापेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि पुणे येथे आहेत. एकीकडे ग्रामीण भागामध्ये शहरापेक्षा लसीकरणाचा वेग वाढता असला, तरीही यात बूस्टर मात्रा घेणाऱ्यांची संख्या कमी आहे”.
पालिकेने राज्यात लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी आग्रही मोहीम पुन्हा सुरू केली आहे. आरोग्यकेंद्रांच्या मदतीने ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांच्या याद्या करण्यात सुरुवात करणार आहेत. पालिकेच्या या निर्णयाने कोणीही लसीकरणापासून वंचित राहणार नाही. तसेच राज्याच्या मृत्युदर विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी आता ज्या रुग्णांना करोनाची लागण झाली आहे, त्यांच्यामध्ये लसीकरण झालेल्या रुग्णांची संख्या किती आहे याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे देखील सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

