मुंबई: आयपीएल मेगा ऑक्शन संपले आहे. ज्यात ५९० खेळाडूंवर बोली लावण्यात आली. आणि केवळ २०४ खेळाडूंना या १० संघानी खरेदी केले आहे. मेगा ऑक्शन असल्याने प्रत्येक संघाला केवळ ४ खेळाडूंना रिटेन करता आले. ज्यामुळे अनेक मोठे खेळाडू वर्षानुवर्षे ज्या संघासोबत खेळले त्यांनाही दुसऱ्या संघात जावे लागले आहे. यात चेन्नई सुपर किंग्ससाठी दशकांपासून खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. चेन्नईला फाफ डु प्लेसिसला पुन्हा खरेदी करता आले नाही. यामुळे चाहते तर निराश झाले मात्र फाफ स्वतः यावेळी दुखी दिसला.
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल मेगा ऑक्शन आधी महेंद्रसिंह धोनी , रवींद्र जडेजा , मोईन अली आणि ऋतुराज गायकवाडला रिटेन केले होते. फाफ डु प्लेसिसला ऑक्शनमध्ये पुन्हा मिळवण्याची त्यांची तयारी होती. मात्र फाफचे नाव बोलीसाठी येताच अनेक संघानी मोठ्या किंमती लावल्या. त्यामुळे चेन्नईला फाफला गमवावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने फाफ डु प्लेसिसला ७ कोटीत आपल्या संघात घेतले. यानंतर फाफने एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यात त्याने चेन्नईच्या चाहत्यांचे आणि चेन्नई संघाचे आभार मानले होते.
फाफ डु प्लेसिसने चेन्नईसाठी अनेक सामने जिंकून दिले होते. गेल्या वर्षी जेतेपद मिळवून देण्यात फाफ आणि भारतच तरुण फलंदाज ऋतुराज गायकवाड सोबत होते. त्यांची सलामीची जोडी चेन्नई साठी स्टार ठरली. फाफने आता ऋतुराज सोबतच्या नात्याबद्दलही भावनिक वक्तव्य केले आहे. न उक्त्याच एका मुलाखती फाफ म्हणाला “चेन्नई संघात मी ऋतुराजच्या मोठ्या भावासारखा होतो. तो खूप प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मी त्याचसोबत सलामीला उतरणे मिस करेन” फाफ डु प्लेसिस २०११ पासून चेन्नईचा भाग राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- बॉलिवूडचा ‘गोल्डन’ आवाज हरवला; बप्पी लहिरी यांचे निधन
- ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर श्रीशांतची भावनिक पोस्ट म्हणाला..
- ‘कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत’ – किरीट सोमय्या
- “आज फिर एक बिल्लीने…” ; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर अप्रत्यक्ष टीका
- ‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ‘ब्लू आईड बॉय’ आहात की शरद पवारांचे’ – मोहित कंबोज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
