Share

Chennai Super Kings | धोनीनंतर कोण सांभाळणार चेन्नई सुपर किंग्स?, CSK च्या प्रशिक्षकांनी दिली माहिती

Published On: 

आयपीएल (IPL) 2021 चा ऑरेंज कॅप विजेता ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) सध्या विजय हजारे ट्रॉफी मध्ये धुमाकूळ घालत आहे. या स्पर्धेमध्ये द्विशतक करून त्याने अनेक विक्रम मोडले आहे. भारतीय संघाचा हा युवा सलामीवीर विजय हजारे ट्रॉफीनंतरच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ ऋतुराजच्या या कामगिरीचे कौतुक करत आहे. कारण आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाड महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) च्या नेतृत्वाखाली या संघाकडून खेळतो. आयपीएल 2022 मध्ये ऋतुराज सुरुवातीला चांगली कामगिरी करू शकला नव्हता. पण स्पर्धेच्या मध्यभागी तो परत फॉर्ममध्ये आला. दरम्यान चेन्नईचे फलंदाजी शिक्षक मायकल हसी यांनी ऋतुराजचे कौतुक करत एक मोठा खुलासा केला आहे.

मायकल हसी ऋतुराजबद्दल बोलताना म्हणाले की,”ऋतुराजने महेंद्रसिंग धोनीला खूप जवळून बघितले आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये अनेक समानता आहे. ते इतरांपेक्षा लवकर गोष्टी समजून घेतात. त्याचबरोबर धोनीप्रमाणे ऋतुराज देखील स्वयंनिर्मित क्रिकेटपटू आहे. ऋतुराज इतर खेळाडूंपेक्षा शिकण्यात खूप चांगला आहे.”

पुढे बोलत मायकल हसी म्हणाले की,”ऋतुराजमध्ये कर्णधार पद सांभाळण्याचे सर्व गुण आहे. तो एक शांत आणि समजूतदार खेळाडू आहे. आगामी काळामध्ये तो चांगला कर्णधार बनवू शकतो. सीएसकेच्या योजनेबद्दल मला माहित नाही, पण धोनीप्रमाणे ऋतुराज संघाचे चांगले नेतृत्व करू शकतो. कारण जेव्हा तणावकारक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा ऋतुराज धोनीप्रमाणे शांत असतो. त्याचबरोबर केव्हा, कुठे आणि काय करायचे याचे देखील त्याला भान असते.” पुढे बोलत हसी म्हणाले,”चेन्नई सुपर किंग्स मधील इतर सहकारी त्याच्या स्वभावामुळे अधिक संघाशी जोडले जातील. परिणामी सीएसके हा एक उत्तम संघ तयार होऊ शकतो.”

ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये केलेल्या कामगिरीवर बोलताना म्हणाले,”खेळामध्ये त्याला थांबवणे आता कठीण आहे. ऋतुराजला आता धावा करत राहायचे आहे. कारण ऋतुराज इतका अद्भुत खिलाडी आहे की, जेव्हा तो फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला थांबवणे कठीण असते. सीएसकेमध्ये नेहमी ऋतुराजच्या भारतीय संघातील स्थान विषयी चर्चा सुरू असते.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!